मैत्री
मैत्री
मैत्रीची मोठी गंम्मत असतें,
थॅन्क यु..सॉरी त्यात नसते..
नसतो कोणता शिष्टाचार,
शिव्याचा भडीमार.. प्रेम दाखवे..
कितीही मोठा झाला कोणी एक,
बालपणीचाच अंड्या असतो..
ऐकरी हाक कानी पडता ,
बालपणीचाच मित्र तो असतो..
मैत्रीत नाही स्पर्धा कुठली,
ना कोणतेही हेवे अन दावे..
सुखदुःख, नी यशापयश,
एकमेकांचे असतें सारे..
मैत्रीत सर्व असे सारखे,
नाही कोणी राजा वा रंक..
उत्तम उदाहरणं आहे याचे,
सुदाम्याचे पाय धुतो कृष्ण..
गुपित जीवनामधले आपल्या,
फक्त मित्रा ठाऊक असे ते ..
तो पण सांगे ते न कुणास,
जीवनाचाच जणू भाग असे ..
मिळता धन,विद्या,मानमरातब,
लौकिकार्थी संपन्न तुम्ही..
मित्र नसता जेव्हा तुम्हा,
तुम्हापेक्षा गरीब जगी ना कुणी ..
मित्र जेव्हा सोडून जातो,
काळजाचाच तुकडा पडतो..
आठवणीच उरतात तेव्हा,
मैत्रीची सदैव स्मरते गाथा..
मैत्रीच्या या अतूट नात्याची,
कशी लिहावी तिची थोरवी..
शब्द सामर्थ्य कमी पडतंसे,
थांबली हेमंताची लेखणी..
