आठवणीतला श्रावण
आठवणीतला श्रावण
हासत नाचत आल्या श्रावण सरी..
बरसल्या मग आठवणींच्या सरी ..
सणांची ती लगबग सारी..
आईची मग धांदल सारी..
पंचमी ,मंगळागौर ,ररक्षाबंधन..
माहेरवशींनीसाठी तीच एक आठवण..
सखींचा तो कल्ला किती ??
भावंडाचा गोतावळा किती??
अंगणी फुलला पारीजात..
लिली ,कुंदा ,गुलाबांची ही त्यांना साथ..
देवघरात मिणमिणता प्रकाश..
गोड नैवेद्यांचा दरवळे सुवास..
हिरवळ रानातले वनभोजन..
सवंगड्या सोबतीने रमलेले मन..
गावातील नदीवर फुलले..
सख्यांचे आनंदी सोहळे..
व्रत वैकल्यांनी भरली ..
श्रावण मासातील मैफिली..
