आत्मजा
आत्मजा
नकळत झाली माझी सखी
कळत नाही कधी
तुच झाली माझी जननी
जगण्याची प्रेरणा तू
माझ्या अंतरीची संवेदना तू
ध्येय तूच! वाट ही तू
ओठावरचे हसू तू
फुललीस माझ्या वेलीवर तू
माझ्या अस्तित्वाचे पूर्णत्व तू
अजाणतेपणी माझी शक्ती बनलीस तू
फुलवता फुलवता तुजं
मी च फुलत गेले
ममत्व माझे खुलले
घ्यावी तू उंच भरारी
पहावे मी तुज उंच आकाशी
पंख तुझे भरारी तुझी
स्वप्न माझे पूर्णत्वास तू नेशी
जग म्हणती तूज तनुजा
परि मज जगविणारी तुच आत्मजा....
