पाऊस...
पाऊस...
आज पावसा तू ही साथ दिलीस..
अश्रू जे लपत असतात सगळ्यापासून
वाट तू त्यंना मोकळी केलीस..
मिसळले आसवे तुझ्या थेंबात
साथ तू त्यांना दिलीस..
खूप दिवसांचे साचले होते..
निचरा होणे गरजेचे होते..
एरवी त्यांची चव खारट...
आज तुझ्या साथी ने झाली फिकट..
कुणा आनंद तुझ्या बरसण्याचा
आसवांना मात्र तुझ्यात मिसळण्याचा..
असाच मिसळत जा अधून मधून
एकाकी अश्रूंना बिलगत जा हळूच
तुझ्या सुगंधाने हरवली वेदना..
आशेचा रूजला अंकुर नवा..
सृष्टी बदलास सज्ज झाली
अश्रूंची हि फुले झाली...
