आई
आई
जेव्हा होतात जखमा,
वेदना तीव्र जाणवते
फुंकर मारण्याला तेव्हा
आई सोबत असतें..१
आईचा मऊशार पदर
अभेदय सुरक्षा कवच
चुकीचे आपण जरीही
आई सुरक्षा करते..२
आईचे प्रेम डोळयांत
ममतेचा अथांग सागर
वळण लावण्यासाठी
आई डोळे मोठे करते..३
आईचे विशाल हृदय
क्षमेचा तेथे अधिवास
लाख चुका त्या तुमच्या
आई सदैव पोटी घेते..४
आई नव्हे, भगवन्त
भुतलीचा आम्हा देव
जाते जेव्हा खूप दूर,
देवघर रिकामे होते..५
