आई पहिली गुरू
आई पहिली गुरू
आईच्या गर्भातच असता शिक्षण माझे झाले सुरू
जन्म घेण्याआधीच लाभली आई माझी पहिली गुरू
बोबडे बोल शिकवत शिकवत, विद्याधन मज देई माता
आरोग्याची ती घेई काळजी; अन्नपूर्णा, मम जीवनदाता
आचरण जिचे निर्मळ, सात्त्विक; दोष न काही स्वभावात
सुसंस्कार ते घडवून मजवर, सोडिले मज जीवन-प्रवाहात
मार्ग चालता पडले जरी मी, सावरण्याला असे पाठी
पुढे पुढे ती दाखवी रस्ता, आंधळ्याची जशी काठी
ऐसा शिक्षक मिळता जीवनी, भाग्याला नच काही सीमा
विद्यार्थ्याच्या उत्कर्षातच गुरू माने आपली गरिमा
जगात ह्या वावरण्याला घडविले सक्षम, लायक मजला
तूच पहिली शिक्षक माझी; गुरु माऊली, हे वंदन तुजला
