आठवणी
आठवणी
मागे वळून पाहताना....
लुकलुकतात आठवणींचे दिवे
काही विसरावेसे, काही हवे-हवे
पण ....
आठवणींवर नसते सत्ता आपली
कधी कोणती आठवावी
अन कोणती विसरावी
ती येते तिच्या मार्गाने, तिच्या वेगाने
अन ढवळून जाते मनाला
मला, तुम्हाला, प्रत्येकाला
नको-नकोशा आठवणी येती परतून
दाखवाया रंग मनाचे
हव्या-हव्याशा येती उलगडून
उधळण्या वैभव तयांचे
एक कोपरा प्रत्येकाचा
असतो अगदी आवडीचा
रिकामपणी खेळ चाले आठवणींचा
कधी उदास, कधी मोरपिशी मनाचा
पकडले जाताक्षणी उडते गंमत
त्यातच त्यांची खरी रंगत
आठवणी सोडती कधी न संगत
मागे वळून पाहताना.....
