व्यक्त होताना
व्यक्त होताना
1 min
196
उगाचच हसून दाखवलं जातं
सगळ्यांमधे बसून असताना
कोणीच समोर नसतं
डोळे पाणावताना
दूर दूर धावत रहाते
विचारांची रेषा
व्यक्त करायला तेव्हा
सापडत नाही भाषा
हे असंच चालायचं.....
हे असंच चालायचं
म्हणून स्वत:ला समजावताना
मी खूप शूर आहे भासवताना
मनातल्या सशाला दडवताना
तारांबळ उडते ख-या भावना लपवताना
मग......
व्यक्त होऊ द्या त्यांना
वाट फुटेल तशा
कोंडून ठेवाल तर
वणवणाल दाही दिशा
पण मिळणार नाही विसावा
म्हणून.....
बोला, बोलत रहा
मी आणि तू पेक्षा
आपण व्हा
मग कळेल.....
जग खूप सुंदर आहे
आपण व्यक्त आहोत
तर सगळेच आहेत
अव्यक्ताचं रहस्य शोधण्यापेक्षा
व्यक्ततेत समाधान आहे
व्यक्ततेतच सुख आहे
