नाते तुझे नि माझे
नाते तुझे नि माझे
तू असता न पळभर विसावा
नसता तू न साहवे हा दुरावा
तू असता लगबग कामाची
नसता तू दिवस-रात्र बिनकामाची
तू असता चाले घड्याळाशी शर्यत
नसता तू वेळ ही नाही सरत
असे कसे हे नाते आपले
समोर असता राही झगडत
दूर होता बसते आठवत
वर्षामागून वर्षे उलटता
एकमेका ओळखता-जाणता
माझे न उरले आता काही
पैलतीर गाठीन तुझ्यासवे पाही
