STORYMIRROR

Raakesh More

Romance Classics Inspirational

4  

Raakesh More

Romance Classics Inspirational

अनोळखी असूनही

अनोळखी असूनही

1 min
418

अनोळखी असूनही 

तिचं हसणं वेगळंच होतं 

माझ्याकडे हसून 

तिचं बघणं वेगळं होतं || 0 ||


एक करंट जाणवला शरीरात 

काहीतरी घडलं होतं 

माझं मन क्षणार्धात 

तिच्यावर जडलं होतं 

त्या दोन क्षणात 

माझं जगणं वेगळं होतं 

माझ्याकडे हसून 

तिचं बघणं वेगळं होतं || 1 ||


स्वतःला ती सावरू लागली 

हे विचित्र होतं 

हावभाव ती आवरू लागली 

हे विचित्र होतं 

तिचं केसावरुन हात फरवून 

सजणं वेगळं होतं 

माझ्याकडे हसून 

तिचं बघणं वेगळं होतं || 2 ||


मला बघताच चेहऱ्यावर 

हास्य तिच्या उमललं 

मला बघताच नजरेत 

तेज तिच्या उजळलं 

मला बघून तिचं तर 

दचकणं वेगळं होतं 

माझ्याकडे हसून 

तिचं बघणं वेगळं होतं || 3 ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance