Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Jyoti gosavi

Inspirational

3.0  

Jyoti gosavi

Inspirational

कधीच झालो असतो क्वालिफाय

कधीच झालो असतो क्वालिफाय

1 min
372


जरी होती आवड मला

फुटबॉल खेळण्याची

पण घरची परिस्थिती

होती गरीबीची

जाणीव होती मजला

माझ्या जबाबदारीची

कसेही करून मग

धरीली कास नोकरीची

केली होती डिग्री

मी तर आयटीची

म्हणून वाट धरीली मी

कार्पोरेट जगताची

ऊसंत नाही माझ्याकडे

श्वासही घेण्याची

फुर्सत नाही माझ्याकडे

स्वप्ने बघण्याची

तरीही ही खंत मनाची

मनातून जाईना

दाखवत राहतो मग मी

स्वतःसचं आईना

आवडत होते मजला

रोनाल्डो मेस्सी

मी पण होतो त्यांचा

अवतार देशी

देशालाही लागली

एका खेळाडूची हाय

नाहीतर आपण कधीचे

झालो असतो क्वालिफाय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational