रहावे त्याच्या आधीनस्त
रहावे त्याच्या आधीनस्त
कधी कधी तिच्यासाठी
भीतीची भिंत उभी केली जाते
कधी कधी भिंतीमुळे तिच्या
मनात भीती निर्माण होते
त्याचा एकच प्रयत्न असतो
राहावे तिने भीतीग्रस्त
भिंतीचे परिमाण आखून
राहावे त्याच्या आधीनस्तं
इकडे जाऊ नकोस
तिकडे पाहू नकोस
अशी बोलू नकोस
तशी चालू नकोस
या साऱ्या सूचनानी
ती होत असते त्रस्त
तो मात्र जगत असतो
आपल्याच धुंदीत मस्तं
तिच्या जगण्या वागण्याचा हिशोब
त्याच्या डायरीत असतो
तिने मात्र कशाचाच
जाब विचारायचा नसतो
तिन आवडीनिवडी सांभाळायच्या
फक्त चार भिंतीत राहून
त्याचा शब्द झेलताना
स्वतःला घ्यायचं वाहून