कैफ
कैफ
कैफात माझिया झुलणार कोण आहे
आव्हान वादळाला देणार कोण आहे
भिडतो मी नभाला सोडून सर्व धागे
बरसतो धरेवर घेऊन संचित जगण्याचे
शिसमी देव्हाऱ्यात देव सारी स्थापिली
फुले वाहीली सुगंधी पहाटेच खुडलेली
नीर वाहिले शुद्ध गंगाच इथे अवतरली
मनातली देवतळी मात्र संपुर्ण सुकलेली
शापित शिपाल्यांचे सागर किनारे भरती
मोत्यांचे इथे तरीही रोज बाजार सजती
हजार चांदणे चंदेरी नभी नक्षी जरीती
आभुषणे वलकलांचे इथे माझेच खुलती
मुशाफिरी माझी उलट पावलांनी धावणारी
सोडून सावल्यांना अंधार कवेत घेणारी
उसासे उसने घेऊन आनंद वाटणारी
आसवांनी वाळवंटात अंकुर फुलवणारी
