STORYMIRROR

Kanchan Kamble

Tragedy Abstract

1.4  

Kanchan Kamble

Tragedy Abstract

काय सांगू

काय सांगू

3 mins
2.8K


काय सांगू बयना

माया जीवनाचा घोयना

देशी ढोसते नवरा रोज

राहे ना अंगावर चोयना

पिऊ पिऊ त्याचे

डोये पसाभर गेले खोल,

तरी नाही खात थो कधीच

बाई झोलं

रातभर माही तर झोप उड़ते वासानं

जीव मयकते,कयसते,

त्याच्या अशा पिण्यानं

एकडाव पिउंन शान

घुसला शेजारच्या घरात

बावरली शेजारीन मारल त्याच्या भल्लच उरात

अलीकडे बाई थो लयचं करते नखरे

कायजाचे माहे झाले, लय लय टुकडे

भांडे कुंडे मोडूंन ,त्यानं 

घर केल रीकाम

नाही सुदयान करत 

पैशासाठी दोन काम

फुकटच खाते ,वरुन देते धवस

सुधरा साठी त्याले,किती केले नवस

देव बिव काही नाही

माह्या दुःखात धावला

नवसाचं पोरग सासुच

पन मह्या मातर दुख्खाचा प्याला 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy