काय कमावले?
काय कमावले?


शब्द शब्द गुंफताना
शब्दच माझे झाले
एकांतात तेच खरे
सोबती माझे झाले
वेळेवर न सूचता
कधी खूप सतावले
स्पर्धेत उतरण्यास
मला प्रवृत्त केले
वेळचे बंधन पाळण्या
कधी ते धाव धावले
विजेत्याच्या मुकुटी
कधी सहभागी बनले
वाढदिवस रचना
उपक्रम कधी बनले
कवितेच्या प्रकारात
साथ तेच देत राहीले
विचारलेच मला जर
मी काय कमावले?
या शब्दांच्या ओंजळीत
विश्व माझेच सामावले!