कातड्याची कुलूप
कातड्याची कुलूप
नेहा आणि मेघा दोघी लहानपणापासूनच्या जिवलग मैत्रिणी, शाळेत सोबतच होत्या. दोघीजणी खूप हुशार होत्या.परंतु नेहा समजदार आणि सगळ्यांचे मन जपणारी ,मनमिळाऊ होती.बोलतांना देखील सगळ्यांशी नम्रतेने बोलत असे.याऊलट मेघा होती.ती फटकळ ,स्वताचच बघणारी,हट्टी, होती.
हळू हळू दोघी मोठ्या होत गेल्या सोबत शिक्षण झाली , दोघी हुशार पूर्ण शिक्षण घेऊन दोघी स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या.एकामागोमाग दोघींचे लग्न झाले.
नेहाला स्थळ शोधले तेंव्हा नेहा शांततेत सगळं आपल्या आई वडिलांचं ऐकायची.तिला माहिती होत आई वडील आपलं चांगलंच करणार म्हणून.
या विरुद्ध मेघा तिचे विचार खूप वेगळे होते.तिने आधीच आई वडिलांना सांगितले होते ,".घरात मला सासू सासरे बघून दिले तरी मी त्यांच्यासोबत राहणार नाही.आम्ही दोघे नोकरीच्या गावाला राहू." एका मागोमाग दोघींचे लग्न झाले.दोघीनाही सासरी चांगले माणसं मिळाली.परंतु मेघाला आधीच राजा राणीचा संसार हवा होता म्हणून ती थोडे दिवस सासरी राहून ,दोघेजण नोकरीच्या गावाला निघून गेले.
दोघेही कमावते असल्यामुळे पैशाची काही कमी नव्हती.परंतु सकाळी कामावरून चीड-चीड व्हायची. दोघांनाही सोबतच बाहेर पाडायचं होत.
नेहा समजदार असल्यामुळे तीच्या घरी सासू, सासरे, आणि हे दोघेजण अस चार जनाच कुटुंब होत.नेहा सकाळी उठून सगळी कामे आवरूनऑफिसला दोघे सोबत जात असत.तिच्या सासूबाई देखील समजदार होत्या.घरी आल्यावर दोघांना सोबत चहा करून द्यायच्या."थकली असेल ना? थोडा आराम कर .मायेन सांगायच्या."
परंतु मेघाच तस नव्हतं दोघेच असल्यामुळे घरी आल्यावर पण, "मलाच चहा पाणी करावं लागतं मीपण थकते". म्हणून ऑफिसला निघताना भांडण आणि घरी आल्यावर पण भांडण. दिवसामागून दिवस जात होते एक दिवस दोघींनी भेटायचं ठरवलं.
नेहाने मेघाला तिच्या घरी बोलावलं.दोघींच्या पदरात एक एक गोंडस मुले देवाने दिली होती.घरी कोणी सांभाळण्यासाठी नव्हतं म्हणून मेघाने तिच्या एक वर्षाच्या मुलाला सोबत आणलं होतं.नेहाने आणि सासूबाईंनी तिचा खूप छान पाहुणचार केला. तू मैत्रिणीशी गप्पा मारत बस .मी बघते स्वयंपाकाचं अस सासूबाई नेहाला खोलीत येऊन सांगून गेल्या होत्या.हे सगळं बघून मेघा आश्चर्यचकीत झाली.
सगळे सोबत आनंदाने जेवले.नेहाच्या मुलाला आजी अधून मधून सांभाळत होती .लगबगीने कामे देखील करत होती.असाच बोलता बोलता विषय निघाला, नेहाने विचारले,"तू ऑफिसला गेल्यावर तुझ्या मुलाला कुठे ठेवते?" तेव्हा डोळ्यात पाणी आणून मेघा म्हणा ली ,"पाळनाघरात"तेव्हा नेहालाही थोडे वाईट वाटले.परंतु आज मेघाला तिच्या सासुबाईंची खूप आठवण येत होती.
बऱ्याचवेळ गप्पा मारून झाल्यावर नेहाच्या सासूबाईनी आवाज दिला."तुम्हाला दोघीना फिरायला, शॉपिंगला जायचं असेल तर जा"?मी सांभाळते दोघांना,आज मेघादेखील नेहाच्या सासुबाईमुळे रिलॅक्स होती.
नेहाच्या सासूबाई त्यांच्या दोघींच्या मुलांची काळजी घेत होत्या काय हवंय काय नको ते बघत होत्या.
दोघींनी आवरलं आणि फिरायला बाहेर निघाल्या, तेव्हा नेहा मेघाला सांगत होती," बघ घरात म्हतार माणूस किती कामच असत, आपण जीव लावला तर मायेन समजून घेणार असत. सासरे पण मुलाला संध्याकाळी फिरायला नेता . ते घरात असल्यामुळे मला काहीही बघाव लागत नाही. आणि माझ्या घराला कुलूप लावायचं देखील मला कधी काम पडत नाही.कारण माझ्या घराकडे आपलेपणाने लक्ष देणारी, माझ्या मुलाला मायेन जपणारी ,अशी कातड्याची चालती बोलती कुलूप आहे.हे तिचे उत्तर ऐकून आपल्याला घरी देखील अशी मायेची,घराकडे लक्ष देणारी,नातवाला जीव लावणारी अशी कातड्याची चालती बोलती कुलूप असावी अस मेघाला वाटलं.
