का? तु न सांगता निघुनी गेलास...
का? तु न सांगता निघुनी गेलास...
का? तु न सांगता निघुनी गेलास ,
विरहाच्या उन्हाला प्रेमाचा ओलावा दिलास ...
ऐकदाही वाटले नाही तुला माझ्याशी बोलावे ,
मनाचा गुंता अलगद सोडवावे ,
काचा मनाच्या विखरून गेलास ,
विरहाच्या उन्हाला प्रेमाचा ओलावा दिलास ...
का? तु न सांगता निघुनी गेलास ...
तुझ्या आठवांनी मेघ दाटले ,
काळ्या ढगांशी झुंज वाऱ्याशी ,
बेफाम उसळले हुंदके प्रितीचे फेसाळलेले,
मृदगंध दिशादिशात दरवळले,
तुझ्या श्वासांचे धुके वर्ण ठेऊनी गेले ...
का? अताशा मला सोडूनी गेलास,
विरहाच्या उन्हाला प्रेमाचा ओलावा दिलास ...
का? तु न सांगता निघुनी गेलास ...

