STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

का कन्हैय्या

का कन्हैय्या

1 min
212

कनकसुंदरी कृतककोपाने

कळकळीने कथन करी

का कन्हैय्या कुठवर करी?

घागरी आमच्या कटीवरी


कसे कुठे वळावे नकळे

कृष्णसखा उभा ठाके

घट डोईवर घट कमरेवर

अचूक खडा कसा टाके


नंदनंदना येसी अवचित

कधी रे सोडशील कन्हैय्या?

वाट नको रोखू नंदलाला

गवळणी मनी बावरल्या!!


लाल कपोली लाज अधरी

राधा लाजलाजूनीया चूर

सदा हरीनाम ओठावरी

कसा आगळा हिचा नूर!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract