STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational Others

3.8  

Shila Ambhure

Inspirational Others

ज्योत

ज्योत

1 min
17.2K


दिवा, समई, पणती

कसे हे मिणमिणती,

करी वाऱ्याशी सामना

चिमुकली एक ज्योती.


स्वतः उभी अंधारात

इतरा प्रकाश देती,

इवलासा देह परी

हित दुसऱ्यांचे चिंती.


क्षण एक येतो असा

जाय झिजुनी पूर्णतः,

मिणमिण होई शांत

वाटे तयात धन्यता.


गुण असा एक छान

घेऊ दिव्याचा आपण,

पावलागणिक बनू

उजेडाची छोटी खाण.


दाऊ वाट सकलांना

देऊ मदतीचा हात,

लख्ख उजेड ना जरी

बनू इवलिशी ज्योत.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational