ज्यांनी भारत घडविला
ज्यांनी भारत घडविला
ज्यांनी भारत घडविला
इतिहासात त्यांच्या कथा
देशासाठी झिजले त्यांची
चला गाऊ गुणगौरव गाथा
देशभक्तीचे रुजलेले बीज
होते ज्यांच्या ज्यांच्या ठाई
देशभक्तीचे पिऊन बाळकडू
भारतमातेला मानले आई
गुलामगिरी अन् अत्याचार
दिला यांच्याविरोधात लढा
स्वदेशी नि स्वातंत्र्यप्राप्तीचा
जन्मभर त्यांनी गिरवला धडा
त्यांचा त्याग आणि बलिदान
जाऊ द्यायचा नाही व्यर्थ
स्वराज्यात सुराज्य आणण्या
करु आपण प्राणांची शर्थ
चला आता वेळ ना दवडू
देशसेवाव्रत मिळूनी घेवूया
भारत भू ची लेकरे आम्ही
देशसेवा निष्ठेने करत राहूया!!!