जय विज्ञान
जय विज्ञान


सी.व्ही.रमण,
यांचा जन्मदिन,
राष्ट्रीय विज्ञानदिन,
म्हणून करती जन।।
समाजातील वैगुण्य,
कुप्रथा दूर सारुन,
अंधश्रद्धा निर्मुलन,
देश करु सज्ञान।।
निसर्गाचे रक्षण,
आणि संवर्धन,
ठरेल नवसंजीवन,
वाचेल पर्यावरण।।
ऱ्हास थांबवून,
आभार मानून,
करु ज्ञानदान,
वाढवून शान।।
आजच्या गर्भात,
भविष्य उद्याचे
करुनी सारे जतन,
बनू प्रगतीशील साधन।।
शास्त्रज्ञ सी.व्ही.रमण,
भारतीयांची आहेत शान,
आम्हा सदैव अभिमान,
वाटू जगभर त्यांचे ज्ञान।।