Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Manisha Awekar

Inspirational

3  

Manisha Awekar

Inspirational

जरा सावरावे आता

जरा सावरावे आता

1 min
204


काव्यप्रकार  अष्टाक्षरी


अवचित संकटच

कोसळले विश्वावरी

अकल्पित जाणिवेने

मन थिजे बर्फापरि  (1)


देती टक्कर शर्थीने

अविरत प्रयत्नांनी

माणुसकी ओथंबली

सहृदय मनातूनी    (2)


मन खंबीर ठेवावे

जरा सावरावे आता

अश्रु पुसावे जनांचे

धन दान द्यावे हाता  (3)


संवेदनशील व्हावे

मुखी भरवावा घास

निरपेक्ष कर्मामधे

देव नित्य करी वास   (4)


दिन जातील सरुनी 

आशा मनी पालवते

तम सरुनी जाताच

नभी उषःप्रभा येते (5)


Rate this content
Log in