जर ती नसती तर...
जर ती नसती तर...
जर ती नसती तर , सृजनाचे काम
कोणी केले असते?
लहान भावाला , चिऊकाऊचे घास
कोणी दिले असते?
लहान बहिणीला , प्रेम देऊन
कोणी रिझवले असते?
दोन्ही घरांचे कळस , नववधूशिवाय
कोणी उजळले असते?
प्रेम , माया , आदराने , घराचे घरपण
कुणी टिकवले असते?
वात्सल्याने बाळ जपताना , वाढवताना
कोण रात्रभर जागले असते?
देवघरातल्या देवांचे , मांगल्य ,
पावित्र्य
कुणी जपले असते?
सायंकाळी , समईच्या मंद तेजात
कुणी प्रार्थिले असते?
स्वतःकडे , कमीपणा घेऊन वादविवाद
कोणी मिटवले असते?
ती नसती तर , जग झाले असते
भयंकर वाळवंट
ब्रम्हदेवाला , कोडे पडले असते
कसे टिकवावे ब्रम्हांड?
ती नसती तरची , कल्पनाच करवेना मनी
ती आहे म्हणूनच , विश्व आहे टिकूनी
