STORYMIRROR

Rahul Sontakke

Abstract

4  

Rahul Sontakke

Abstract

एकटा पडलो तरी लढलो

एकटा पडलो तरी लढलो

1 min
298

एकटा मी विचारांचा 

अन् आभासी दुनियेचा 

दूनियाच्या गर्दीतून 

बाहेर पडलेलो एकटा 


एकटा पडलो तरी लढलो 

निस्वार्थ मनाला संकटे आली 

वादळ आल,वारा आला 

पुन्हा त्या जोशात सकाळ झाली 


स्वतःच्या स्वार्थासाठी 

येथे रस्सीखेच दिसते 

दुसऱ्याला तुडवून आपणच 

सर्वकाही आहे असे जगाला वाटते 


या पांघरलेल्या आकाशाखाली 

तू एकटा जरी पडला 

जिंकणे जरी नाही जमले 

तू चालत रहा एकटा या वाटेवर 


हात देणारेही भेटतील  

फक्त तू खचू नको 

संघर्षाची तयारी कर 

कधी एकटा पडल्यावर 


माझ्या या लेखणीला 

शब्दांची धार आहे 

एकटा जरी पडलो 

महापुरुषांचा आधार आहे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract