STORYMIRROR

Poonam Wankar ( पूरवा )

Abstract

4  

Poonam Wankar ( पूरवा )

Abstract

हजारदा प्रेमात पडावे..!

हजारदा प्रेमात पडावे..!

1 min
364

शुभ्र धुक्याची वस्त्र लेवूनी

तो दारी उभा ठाकला

मेघकाळा रंग तयाचा

बघुनी मज तो हासला...


श्याम वर्ण जरी तयाचा

मुखी विलक्षण तेज दिसे

कुणीही बघुनी प्रेमात पडावे

उधळावे सारे आयुष्य जसे..


मी ही भाळले

मोह मनाचा आवरेना

स्पर्शावे त्याला, बिलगुणी जावे

किती सावरू मज सावरेना...


बिलगुनी त्याला हळूच पुसिले

कोण तू? देखणा, राजबिंडा दिसतोस?

मी वेडी, बावरी प्रिया रे.. सांग ना..

का बघुनी मजला असा तू हसतोस??


फुलवूनी चंद्रकोर ओठांची

हळूच हसला... नंतर वदला

नकोस वेडे.., सांभाळ स्वतःला

मी प्रेम नव्हे.. मी तर मृगजळ वेडा..


यमराजाचा दुत मी सखे

' मृत्यू ' माझे नाव

तुज नेण्या संगे इथे ठाकलो

आता सोडायचाय तुला हा गाव..


सैल अचानक मिठी ती झाली

घामाने माझी तनु ही नाहली

का असा देखणा मृत्यू असतो??

माझी मी मजला पुसू लागली..


संगे जावे... की इथे राहावे??

वाटे...,

प्रीतीत स्वतःला झोकूनी द्यावे

अश्या देखण्या मृत्यूच्या मी

हजारदा प्रेमात पडावे

मी हजारदा प्रेमात पडावे....!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract