STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

4  

Manisha Awekar

Abstract

स्वैर पक्षी

स्वैर पक्षी

1 min
460

स्वैर हिंडता आकाशी

सुख वाटे सजणास

जाई दूर परदेशी

ढाळी सखी आसवांस


छोट्या चिमण्या पिल्लांना

घेई रोजच कवेत

परि आठव बाबाचा

सलतसे अंतरात


नशा पैशाची चढता

नसे मायेची जाणीव

काळ पुढे सरकता

भासे प्रेमाची उणीव


स्वैर हिंडूनी आकाशी

पक्षी थकूनिया गेला

ऊबदार कोटरात

स्वेच्छेनेच परतला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract