STORYMIRROR

kalpana sawale

Abstract Tragedy

4  

kalpana sawale

Abstract Tragedy

संस्कृती

संस्कृती

1 min
250

प्रत्येक जण इथे

संस्कृती विसरला

आणि थोरा मोठ्यांचा

मानसन्मान विसरला...


कारण 'संस्कार' या शब्दाला

अर्थ न उरला

जसा माणसातला

माणूसच सरला...


बदलली सर्व काया

बदलले सर्व विचार

बदलली जशी संस्कृती

तसे बदलले आचार...


आई बाबांची जागा आता 

मम्मी - डॅडीने घेतली

आणि वृद्धांची जागा

वृद्ध आश्रमात उरली...


गाण्याची मैफिल 

जशी बारमध्ये रंगली

प्रत्येकाची भावना तशी

वेशीला टांगली...


नमस्काराची जागा इथे 

हाय - हॅलो ने घेतली

आणि पायावर डोके ठेवण्याची

रीतच मोडली...


कुंकवाची जागा

टिकलीने घेतली

आणि कुंकवाची डबी 

धुराड्यात पडली...


आजची पिढी फक्त

फॅशनमध्ये अडकली

कपड्यांची कमी सोडा पण

विचारानेही तोकडी पडली...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract