STORYMIRROR

kalpana sawale

Tragedy

3  

kalpana sawale

Tragedy

हरवलेला बाबा...

हरवलेला बाबा...

1 min
346

बाबा तुझी वाट बघते मी

तू कुठे हरवला कळत नाही

संध्याकाळ झाली तू 

का परतला नाही

तू नाही आणला खाऊ

तरी रागवणार मी नाही 

तू फक्त लवकर घरी ये

एवढेच देवाजवळ मागते मी

तुझ्या हाताच्या घासाची चव

दुसऱ्या कुणालाच नाही

तुझ्याजवळ झोपायची सवय 

आता मला झोपच येत नाही

तू रागवलास तरी चालेल 

मला वाईट वाटणार नाही

तुझी आठवण खूप येते 

तुझ्याशिवाय जगण्याचा मी 

कधी विचारच केला नाही.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy