आस्वाद जीवनाचा...
आस्वाद जीवनाचा...
1 min
378
आस्वाद जीवनाचा घेऊन तर बघा
एकदा तरी मनमोकळ जगून तर बघा
आयुष्य खरच खूप सुंदर आहे
दुसऱ्यांसाठी एकदा जगून तर बघा
नेहमी माझं माझं करत बसण्यापेक्षा
निदान एकदा तरी आपलं म्हणून तर बघा
स्वतः आनंदी होण्यापेक्षा एकदा तरी
दुसऱ्याला आनंद देवून तर बघा
सुख कशाला म्हणतात ते कळेल
एकदा कुणालातरी जीव लावून तर बघा
आपली माणसं म्हणजे अनमोल खजिना
त्यांच्या मनात डोकावून तर बघा
खरं तर आयुष्य हा बुडबुडा पाण्याचा
फुटायच्या आत मनसोक्त जगून तर बघा...
