STORYMIRROR

kalpana sawale

Romance

3  

kalpana sawale

Romance

#विरह

#विरह

1 min
248

कसं जगू तुझ्याशिवाय

आज मला कोड पडलं

असं काय नात आपलं

की मन तुझ्यातच गुंतल


तू सोडून चाललीस 

हे सहन होत नाही

डोळ्यातले अश्रू लपवले 

मात्र मनातले लपत नाही


फक्त या विचारानेच

एक क्षण युगासारखा भासे

जीवनातली प्रत्येक गोष्ट 

अर्थशून्य वाटे


कारण प्रत्येक वेळी सोबतीची सवयच मला पडली

मैत्रीच्या पलीकडली नाती आपल्यात जुळली


मला नाही पहायचं 

कधी तुला रडताना

म्हणूनच हसत अलविदा

करेल तुला जातांना


आणि जाताना तुझ्याजवळ 

एवढच मागेन

विरहाच्या ह्या अग्नीत

मी एकटीच जळेन का?

फक्त सांग मनापासून 

त्यात तुझी सोबत असेल ना?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance