STORYMIRROR

kalpana sawale

Romance

3  

kalpana sawale

Romance

तो आणि ती

तो आणि ती

1 min
231

मंद हवा आणि गारवा

दोघांमध्ये वर्षाव प्रेमाचा व्हावा 

अलगद तिची नजर 

नजरेला त्याच्या भिडली

त्याच्या हृदयात जणू

विजच कडाडली

तिच्या ओठावर उमलली

हास्याची कळी आणि

क्षणात पावसाने

बरसायला सुरुवात केली

तिच्या मनातली गोष्ट 

तिच्याच डोळ्यात वाचली

परकी जरी ती त्यास

आज ती त्याला त्याची भासली

तो ही मंत्रमुग्ध झाला पावसात

कारण तिलाही आवडायची बरसात

पावसाने भारी धरला जोर

त्याच्या मनातला पकडला तिने चोर

नकळत तो तिच्या मिठीत गेला

पावसाच्या सरीत बेधुंद झाला...


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Romance