STORYMIRROR

Aarya Gadkar

Abstract Romance

4  

Aarya Gadkar

Abstract Romance

स्वप्न

स्वप्न

1 min
337

स्वप्नांतल्याच नगरीत एक स्वप्न भिजले

सर्वच बाजूंनी मन मात्र थिजले


आठवणींनी सजलेल्या सुंदरश्या जगात,

प्रवेश मनी राजाचा थाटात-माटात.


कल्पनेच्या ग्रंथात आशा,आकांक्षांचा पसारा,

सत्त्यातल्या अडचणींपेक्षा राजा स्वप्नातच बरा.


सुगंधाने न्हायलेला पांढराशुभ्र मोगरा,

फक्त आणि फक्त बोलक्या नयनांना साजरा.


सप्तरंगी इंद्रधनुष्यात खेळणारे स्वप्नांचे रंग,

गर्द सावली ही अशी चांदणे शिंपितच दंग.


बरसणाऱ्या साऱ्या या प्रेमिका अन तारा,

त्या प्रेमाचं प्रतिक मात्र हा बेधुंद किनारा.


राजमहालात भरली आत्मविश्वासाची सभा,

रात्रीचा चंद्र जणू एका प्रितवेडीचा राजा.


Rate this content
Log in

More marathi poem from Aarya Gadkar

Similar marathi poem from Abstract