जमतंय का बघा....
जमतंय का बघा....
*जमतंय का बघा
अनेक झाड लावणं
पर्यावरणाचा
समतोल राखणं*
*जमतंय का बघा
चांगली पुस्तकं वाचणं
वाचनानंदाचा
आस्वाद घेणं*
*जमतंय का बघा
माणसं वाचणं
जनमानसात तसं
स्थान मिळवणं*
*जमतंय का बघा
चांगले संबंध राखणं
वेळ आल्यावर
मदत करणं*
*जमतंय का बघा
गाेड गाेड बाेलणं
मनात किंतु न ठेवता
माणसाला टाळणं*