STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Horror Tragedy

2  

गोविंद ठोंबरे

Horror Tragedy

जखमा...!

जखमा...!

1 min
423

वेदना जखमेत भरत मी वाट काढत होतो

नजरेत भरून वारे मी चाल ढकलत होतो...

अशांत तितक्याच बोचऱ्या,काटेरी पाऊल वाटा

पायाशी तुडवत त्यांना,मी पुढे निघालो होतो...


कित्येक कत्तली झाल्या वाटेत अचानक माझ्या

रक्ताच्या थारोळ्यांना जखमेवर चोळत होतो...

उठलेल्या वासागणिक मी, माणूस शोधत होतो

रक्ताने भिजलेल्या मातीचे, मी भेद पाहत होतो...


प्रत्येक मैलोमैली वासनेचा धुरळा दिसला

फुटलेल्या काकण काचांना, मी माती देत होतो..

पदरात घुमसल्या श्वासांचा, आक्रोश देखत होतो

मी डोळ्यात घालून अंजन, मुका चाललो होतो...


कानात ओरडत होते कर्ण-कर्कश धर्मवेडे

मस्तकाच्या विवंचना ऐकून, मी बधीर झालो होतो...

आवळून मूठ मोठी, हतबल निघालो होतो

पायात घालून बिबवे, हुंदक्यात गवसलो होतो...


नव्हता कुठे निवारा, नुसताच हुल्लड पारा

उन्हाचे चटके सोसून, तहानलेला कावळा होतो...

झालेल्या नागड्या विहिरी, मी थेंब-थेंब शोधत होतो

स्मशान झालेल्या रातीस,गस्त घालत राखत होतो...


देहाचे माझ्या करपले, कातड्याचे लचके झाले

मी विरान रानमाळी, एकटाच थबकलो होतो...

घेतला शेवटचा श्वास अन कात टाकत होतो

मी एकटाच डोळे विस्फारून, त्या जखमा पहात होतो...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror