STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

जिव्हाळा कोठे भेटेल....!

जिव्हाळा कोठे भेटेल....!

1 min
8.6K


जीव्हाळा कोठे भेटेल

हौस कोठे फिटेल

संसार कोठे नटेल

सौख्याचा नारळ कोठे फुटेल


याचीच वाट पाहण्यात

जन्म सारा सरतो

थकून भागून

श्रीहरी तुझे चरण धरतो


जीव्हाळ्याची तहान

आता पूर्वी सारखी भागत नाही

प्रेमाची वणवण काही थांबत नाही

डिजिटलच्या युगात


अंतर फार वाढल

हातावरच अंतर कोसावर गेलं

होत नव्हतं ते नात

आता बोटावर येऊन बसलं


चार चौघांची पंगत

आता पिझ्झा बर्गरच्या पॅकवर थांबली

खरचं बाबा प्रगती ही

फार फार झोंबली....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational