जिवाले लागला घोर
जिवाले लागला घोर
जागो जागी लोक होते
बाता मोठ्या हानतं
टोंगयान परेशान म्हणे
आजचे ब्रम्हचारी कंन्हत
देशाचे आपल्याच असे
आटे कसे झाले ढीले
चमत्कार घडून रायले
कोनाचं कोनाले नाही कळे
वातावरन भलतचं गरमं
सत्तारूढ़ पार्टीचा जोर
मटनहांडी रोजची सुरू
म्हणून जनतेन माजोला शोर
ओपनिंग चा आता
कुथच नाही रायला वांदा
आपल्या देशात नविनचं
सुरू झाला धंदा
देशाची वारी करून (पंतप्रधानाचे)
चौके छक्के हानन सुरु
शेतकरी मरते उन्हात वायत
त्यायले कर्ज माफी नका म्हणते करू
वासे घरांचे फिरले की
असचं होत असते
जिवनाले सारा घोर
असाच लागतं असते
