जिंकायचय
जिंकायचय
आज पुन्हा सगळं मंदावलय, कारभार ठप्प पडलाय.
अनुशासन न पाळनाऱ्यांचा माज आता मोडलाय.
काहीच अवघड नाही, फक्त थोडं नीट वागायचय.
या संकटकाळात चालताना, थोड तरी थांबायचय.
काळाची गरज ओळखून, वागावे लागेल निट.
तर आणी तरच मग, होईल सर्व काही ठीक.
पण तो पर्यंत काय, असच चालणार की काय.
अतीशहान्यांचे पाहिले, मोडून पडतील पाय.
कमवनारे कमवताय मरणारे मरताय, आपन फक्त पहायचय.
चांगलं असो वा वाईट, या लेखनीतून लिहायचय.
भान लिहिण्याचं आहे, आता वागायचं शिकायचय.
एकजुटीने एकत्र लढून, पुन्हा नव्याने जिंकायचंय.
