जिंकायचे तर
जिंकायचे तर
जिंकायचे तर जग होते
पण उभे संकटाचे ढग होते
मी हरलो लढता लढता
ईथे शत्रु ही सजग होते
अनुभव नव्हता जरी मला जीवनाचा
तरी जगता जगता तारुण्यात आलो
पुस्तकातील त्या दुनियेहून
ह्या दुनियेचे रूप विलग होते
जिंकायचे तर जग होते.....
