जीवनगाणे गातच रहावे
जीवनगाणे गातच रहावे
सप्तसूर
जुळवूनी
गीत गावे
आनंदूनी...१
सुखदुःख
येती-जाती
जीवनाचे
गाणे गाती...२
बेसूरही
सूर लागी
स्वर कधी
जीवा लागी...३
सूरताल
हा जपावा
समतोल
तो साधावा...४
तया कुणी
निंदा करी
मन माझे
माफ करी...५
आयुष्याच्या
तालावर
धरी ठेका
सुरांवर...६
सरगम
जीवनात
मिळे सुख
जगण्यात...७
जीवन हे
गाणे गात
राही मन
संगीतात...८
