जीवन
जीवन
उद्या २२ मार्च जागतिक पाणी दिन करिता संदेशात्मक छोटीशी कविता........पाणी वाचवा जीवन वाचवा
पाणी हेच जीवन
पाणी हीच समृध्दी
त्यामुळेच आहे
सर्वत्र पहा वृध्दी ॥
मुबलक मिळता
वापर आंदाधुंदी
खोल जाता साठे
माजते आनाकोंदी ॥
सर्व दुर तीव्र
दुष्काळाच्या झळा
दाटतात अश्रू
सर्वांच्या डोळा ॥
दशा मुक्या जीवांची
नुसती भटकंती
कित्येकांच्या तर
विझल्या जीवनवाती ॥
थांबवा नाश
पाण्याचा व्यर्थ
तरच टळतील
अनेक अनर्थ ॥
पाण्यावीना कसे
सगळे गलितगात्र
योग्य वापर हेच
आपले अनमोल शस्त्र ॥
