झंकार
झंकार
सरस्वतीच्या हाती वीणा
स्वरदेवता पूज्यनीय
आशिर्वच लाभे साधकां
साधकांसी वंदनीय
जागृत देवीस्थान तिचे
कर्नाटकी बासर गाव
स्वर-अक्षर आरंभ इथे
पाद्यपूजेचा तिज मान
जन्मोत्सव वसंतपंचमी
वादक पूजन करती
झंकार स्वरांचा करुनी
तिज आशिर्वच मागती
झंकारव सरस्वतीचा
त्रिलोकात निनाद नादे
कृपा स्वरसाधकांवर
देवते अखंड राहू दे
