STORYMIRROR

Pandit Warade

Classics Inspirational Others

3  

Pandit Warade

Classics Inspirational Others

जगतो कशास आता

जगतो कशास आता

1 min
135

हसलो तुझ्याच साठी

रडलो तुझ्याच साठी

जगतो कशास आता

मजला कसे कळेना?


भलतीच आस केली

बसलो उदास कैसा?

उपयोग काय आता

मजला कसे कळेना?


मज पमरास कैसी

चपराक लाभली ती

दिधली कशी, कुणी ती

मजला कसे कळेना?


चुकल्याच पायवाटा

चुकलेच चालणेही

जगतो इथे कसा मी

मजला कसे कळेना?


सुख शोधतो कशाला

सुख हे उशास असता

कळते मनास आता

कळते परी वळेना



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics