जगणं राहून गेल...
जगणं राहून गेल...
बालपण, तारूण्य,नाती गोती माणसं
सार किती वेगान सुटत गेलं
आयुष्य पुढ सरकल जगणं राहुन गेलं
लहानपणी मोठ लवकर मोठ
व्हायचा ध्यास तारूण्यात स्वप्नांचा ध्यास
यशअपयशाच्या नोंद वहीत
हास्य नोंदवायचे राहून गेलं
आयुष्य पुढ सरकलं
त्या त्या क्षंणाच जगणं राहून गेलं
गुंतवणुक कुठे कीती?
पोक्तपणात चढत्या उतरत्या
बाजार भावाची भीती शेअर्स,
मार्केटच्या गणितांवर कुटुंबाची घडी बसविताना
हसनं शेअर करायचं राहून गेलं
सोबत रात्रंदिवस जबाबदारी साठी राबताना
संवाद साधायच राहून गेलं
मिळविणयाच्या शर्यतीत
सुखांना हारवून वय निसटुन गेलं
आयुष्य पुढं सरकल जगणं मात्र राहुन गेलं
