जगा थोडं स्वतःसाठी
जगा थोडं स्वतःसाठी
सरत्या वर्षात खूप काही मागे राहीलं
अस वाटून देखील ओंजळीत खूप काही सापडलं
सुरुवात नवीन करण्या हीच मनी उमेद उमगली
अन् अनुभवांची वाटचं आता नवीन दिशा बनली
प्रत्येक दिवाशी, प्रत्येक वर्षी आपण बांधतो आठवणींची शिदोरी
पण कुठवरं आहे प्रवास हा खरंच कुणा माहीत नाही
वाळूसारखे आयुष्यातले क्षण निसटतात मुठीतुनी
हाती राहाते एवढेचं आपल्या
होण्या अंत या देहाचा जगून घ्या स्वत:साठी
