जुन्याच त्या पण गोड आठवणी
जुन्याच त्या पण गोड आठवणी
1 min
72
न कळत त्या वाटेवर चालताना सडा सांडला आठवांचा...
जुन्याच त्या क्षणांचा डाव मनी पुन्हा मांडला...
भूतकाळाची अलगद भुरळ पडली वर्तमानाला...
गोड त्या आठवणी आज नव्याने फुलू लागल्या...
सरसावले आज पुन्हा एकदा त्यात गुंतण्या...
अन् भानावर आले कड डोळ्यांची ओलावता...
न कळत त्या वाटेवर चालताना सडा सांडला आठवांचा...
जुन्याच त्या क्षणांचा डाव मनी पुन्हा मांडला...