STORYMIRROR

Varsha Tikone

Inspirational Others

3  

Varsha Tikone

Inspirational Others

गुंफण लेखणीतून माझ्या शब्दांची...

गुंफण लेखणीतून माझ्या शब्दांची...

1 min
331

शब्द माझे लेखणी रेखाटतात मनातले बोल...

ओठ अबोल अन् मनाच्या कागदावर शब्दांची रेलचेल...


गडद निळ्या आभाळी स्वच्छंदी पाखरांची सैर...

थव्यातलं एकच पाखरू का झालंय सैरभैर...


हरवलंय मन अथांग सागरात...

विचारांच्या तंद्रीत ना जगाचं भान...


कोडं मनातलं सुटेल तरी कसं...

तुझ्या डोळ्यांत उत्तर मिळेल का मला हवं तसं...


शब्द माझे लेखणी रेखाटतात मनातले बोल...

ओठ अबोल अन् मनाच्या कागदावर शब्दांची रेलचेल...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational