लेखणी आणि माझे शब्द...
लेखणी आणि माझे शब्द...

1 min

11.5K
शब्द माझे लेखणी रेखाटतात मनातले बोल...
ओठ अबोल अन् मनाच्या कागदावर शब्दांची रेलचेल...
गडद निळ्या आभाळी स्वछंदी पाखरांची सैर...
थव्यातलं एकच पाखरू का झालंय सैरभैरं...
हरवलंय मन अथांग सागरात...
विचारांच्या तंद्रीत ना जगाच भान...
कोडं मनातलं सुटेल तरी कसं...
तुझ्या डोळ्यांत उत्तर मिळेलं का मला हवं तसं...
शब्द माझे लेखणी रेखाटतात मनातले बोल...
ओठ अबोल अन् मनाच्या कागदावर शब्दांची रेलचेल...