आयुष्य खुप सुंदर आहे फक्त छान पैकी जगता आलं पाहिजे...
आयुष्य खुप सुंदर आहे फक्त छान पैकी जगता आलं पाहिजे...
क्षणाचा ही भरोसा नाही या घडीला होत्याचं नव्हतं होण्याला,
पण जीवनातला एक एक क्षण मोत्यासारखा आहे,
म्हणून आजच्या दुःखातही सुखाचे मोती ओंजळीत साठवता आले पाहिजे ..
परिस्थितीच्या कचाट्यात न सापडता धीटं होऊन, त्यावर मात करता आली पाहिजे ....
संकटं तरं येतच असतातं, त्याला धैर्याने समोरं जाता आलं पाहिजे ...
आलेली वेळ निघुन तर जाणार आहे, पण या वेळेवर
समंजसपणाची गार झुळूक हळूवारपणे घालता आली पाहिजे ...
खचलेलं मनं ,उदास चेहरा आणि रडत बसण्यापेक्षा,
खंबीर मनाने प्रत्येक स्थितीला सावरता आलं पहिजे..
उद्या काय होईल या विचारात आजचा क्षण गमवण्यापेक्षा,
फक्त आनंदाचा हसरा सुगंधचं दरवळला पाहिजे...
कारण, आयुष्य खुप सुंदर आहे फक्त छान पैकी जगता आलं पाहिजे...
