जे बोलतो ते घडले असते ?
जे बोलतो ते घडले असते ?
जे बोलतो ते घडले असते
तर सारेच साव झाले असते
चोर पोलिस सारे एक झाले असते
जे बोलतो ते घडले असते
तर सारेच राव झाले असते
राव रंक सारे एकच झाले असते
जे बोलतो ते घडले असते
तर सारेच राजे झाले असते
राज्यात जनतेचे काय झाले असते
जे बोलतो ते घडले असते
तर सारेच फकिर झाले असते
संसार कुणाचेच झाले नसते

