STORYMIRROR

Sanjay Gurav

Inspirational

3  

Sanjay Gurav

Inspirational

जात

जात

1 min
268


जन्माआधी जन्म जिचा होतो

मरणानंतरही माग तिचा उरतो

चिकटते कायम भिनते रक्तात

पुरून उरते सकला ही 'जात'...

जातीसाठी खावी माती म्हणून

मातीत मिसळले किती जगात

राखही निसटते उरलीसुरली

निसटत नाही कधीच ही 'जात'...

वेड जातीचे बरे परी तेढ कशाला

उजेडाचे स्वप्न पाहा अंधार उशाला

भेद सोडून देऊया साथ एकमेकाला

'प्रेमाची जात' रुजवू या जिंकण्या जगाला.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational